
E Gram Sevak
Mitra
“e-ग्रामसेवक मित्र”
सरपंच ग्रामसेवक तसेच ग्रा. वि. अधिकारी बंधुनो आपणास ज्ञातच आहे की, शासनाने दिनांक 31 डिसेंबर, 2015 अधिसूचने प्रणाणे चालु वित्तीय वर्षापासून सर्व ग्रामपंचायतीना भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी करण्याचे सुचित केलेले आहे. सदर कर आकारणी ही अधिसूचनेतील निर्देशानुसार करीत असताना जागेचे रेडी रेकनर प्रमाणे दर, वेग वेगळ्या बांधकाम प्रकारानुसार बांधकामाचे दर, बांधकामाचे वयोमान व त्यानुसार घसारा, तसेच जागेचा वापर या इतर सर्व बाबींचा एकत्रीत विचार करुन घर कराची आकारणी करावयाची आहे.
त्या करीता आम्ही आपल्याच सहकार्यातून व आपल्याला आवश्यकते प्रमाणे व ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक बंधूची गरज लक्षात घेऊन आपल्या सर्वांचा मित्रवत”e-ग्रामसेवक मित्र” संगणक अज्ञावली तयार करुन अत्यंत माफक दरात सादर करीत आहोत. ज्याव्दारे आपणास सोप्या व सुट-सुटीत पध्दतीने नमुना 8 तसेच नमुना 9 व मागणी लेख (नमुना 9-क), नमुना 10 तयार करता येतो.
“e-ग्रामसेवक मित्र” अज्ञावलीचे वैशिष्टे
1. नमुना 8 च्या नोंदी सोप्या व सुट-सुटीत पध्दतीने करणे अतिशय सोपे.
2. जागेची फुटातील लांबी व रुंदी च्या नोंदी आपोआप चौ. मीटर क्षेत्रफळात येते.
3. नमुना 8 मध्ये नोंदी करतांना क्षेत्रफळ चौ. फुटात आसल्यास चौ. मीटर मध्ये येते.
व एकुण जागाचे चौ. फुटात किंवा चौ. मीटर मध्ये क्षेत्रफळ घेता येतात.
4. मिळकत मूल्यांक (रेडी रेकनरचे दर) एकदाच लावावे लागतात व वार्ड नुसार बदलता येतात.
5. ग्रामपंचायतीने निश्चित केलेले कराचे दर, रेडी रेकनरचे मुल्य दर इ. बाबी एकाच वेळी लावावे लागतात.
6. तळमजला व त्या वरील सर्व मजल्यांची नोंद घेता येऊन भांडवली मुल्य निघते.
7. रेडी रेकनर प्रमाणे मालमत्तेचे मुल्य व घरपट्टी आपोआप तयार होते.
8. दिवा व आरोग्य कर क्षेत्रफळ नुसार आपोआप लावल्या जातो.
9. घरपट्टी ही महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा ( सुधारणा ), संहिता, 2016.दि. 31 डिसेंबर, 2015 च्या अधिसुचना
नुसार सुधारित पध्दतीने काढली जाते.
10. घर कर काढताना मागील घर कराचे 30 टक्के पर्यंतची वाढ आवश्यकता असल्यास, विचारात घेता येते.
11. नमुना 8 मध्ये चतु:सिमा लावता येतात.
13. शौचालय तसेच शेरा (घरकुल, बोजा इ.) यांचे नोंदी नामुना 8 वर घेता येतात.
14. कर भरणा करतांना थकबाकी वर 5 टक्के दंड आपोआप येतो.
15. नमुना 8 पासुन इंक्डेस यादी तयार होते.
16. नमुना 8 पासुन चालु नमुना 9 आपोआप तयार होतो.
17. नमुना 9 ची थकबाकी भरल्यास त्यापासुन मागणी बील व मागणी लेख तयार होतात.
18. सामान्य पाणीपट्टी रजिस्टर, विशेष पाणीपट्टी रजिस्टर एकाच वेळी तयार होते
19. कर भरल्यास नमुना 10 ची पावती देान प्रतीत लगेच तयार होत.
20. आर्थिक वर्ष बदलल्यास पुढील वर्षाचा नमुना 9 थकबाकी, दंड व चालु मागणी सहीत तयार होतो.
21. इंग्रजीत टाईप केल्यास आपोआप मराठीत रुपांतर होते.
22. सर्व भरलेली माहिती सुरक्षीत ठेवून ग्रा.पं.कर्मचारी / संगणक परिचालक कोणताही फेरबदल न करता नियमित नक्कल काढु शकतात.
23. आज्ञावलीला पासवर्ड फक्त ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांचे साठी.
24. आपोआप Backup file तयार होते.
25. एक व चार वर्षेसाठी साठी नसुन ते आपण नियमीत बदल करुन वापरु शकता.


सुरुवातीची स्क्रीन

नमुना ८ एन्ट्री फोर्म
